पान:ओळख (Olakh).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमक्याच आकृती कलाकृती आहेत, इतर आकृती कलाकृती नव्हेत हा निर्णय कुणी द्यायचा ? रसिकांचे निर्णय कलाकृतीचा आधार घेऊन आणि कलाकृतींचे निर्णय रसिकांचे आधार घेऊन देणे जर भाग असेल, हे दोन्ही घटक जर परस्परावलंबी असतील तर मग कलांच्या संदर्भात समाजात जी विधाने उपलब्ध होतात त्यांतील अमुकच विधाने कलासमीक्षेतील उत्स्फूर्त विधाने होत हे कोण सांगणार ? जोपर्यन्त याबाबत काही स्पष्टीकरण करता येत नाही तोपर्यंत विधानांच्या आकारांचे विश्लेषण या दोन्ही बाबींकडे तरी अधांतरी लोंबकळत राहतात. पाटणकरांच्या विवेचनातील कच्ची जागा इथन आपले स्वरूप दाखवू लागते.
 सौंदर्याच्या जाणिवा निर्माण करणे हे कलामीमांसेचे कार्य नव्हे. कुणीही मान्य करील. कारण कलामीमांसा हे शेवटी तात्त्विक विवेचन असते. हे तात्त्विक विवेचन रसिकतेला जन्म देऊ शकणार नाही. प्रश्न असा आहे की, सौंदर्यविषयक जाणीव सौंदर्यशास्त्र निर्माण करीत नसते, हे सर्वमान्यच आहे. मग या जाणिवा कोण निर्माण करते ? एक तर या जाणिवा प्राणिसष्टींना वारसाहक्काने माणसाला प्राप्त होणाऱ्या जीवशास्त्रीय मूळ असणाऱ्या जाणिवा आहेत असे आपण म्हटले पाहिजे किंवा या जाणिवा जीवशास्त्रीय नसून मानवी समाजात निर्माण होणान्या सांस्कृतिक जाणिवांपैकी आहेत असे आपण म्हटले पाहिजे. पाटणकरांची मीमांसा समाजात असणाऱ्या सौंदर्यविषयक जाणिवा कशा निर्माण होतात ह्याचे निश्चित उत्तर स्वतःच्या मनाशी गहीत धरीत नाही आणि दुसरे म्हणजे, कलासमीक्षेतील उस्फूर्त सकल्पना कोणत्या ठरवायच्या, याबावत मार्गदर्शन करीत नाही. असे मार्गदर्शन पाटणकरांनी केले असते तरी ते निर्विवाद ठरले असते असे नाही. पण या मुद्यावर कोणती तरी स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय ज्या पद्धतीने पाटणकर जात आहेत त्या पद्धतीच्या विवेचनाला दृढ असा आधार लाभत नसतो..
 पाटणकर यांच्या विवेचनपद्धतीतील अंगभत उणिवा सांगण्याचा हेतू त्यापेक्षा निर्दोष अशी एखादी पद्धत माझ्यासमोर आहे इकडे लक्ष वेधणे हा नाही. उलट मला असे वाटते की, कलामीमांसेच्या क्षेत्रात कोणतीही पद्धत स्वीकारली तरी त्यामुळे अडचणी निर्माण होतातच. पण अशा अडचणी निर्माण होत असल्या तर त्याचे उत्तर अधिक सावधपणे केलेल्या चिकित्सेतुनच देता येईल हे उघड आहे. पाटणकरांची ही चिकित्सा अतिशय सावध आणि मर्मस्पर्शी असते.

सामान्यपणे संस्कृत काव्यशास्त्रावर लिहिणारे लेखक परंपरेविपयीच्या

ओळख

९४