भाग पचविसावा. resa A2S-- ऑईल इंजिननें चालणा-या पंपांसंबंधीं. अलीकडे बैल फार महाग झाल्यामुळे तसेंच त्यांस पोसण्यास फार खर्च येतो ह्मणून आणि मजुरी महाग झाल्यामुळे ऑईल इंजिननें चालविण्यास पंप वापरण्याची फार प्रवृत्ती व्हावयास लागली आहे.' ह्मणून त्यासाठीं कांहीं लिहिल्यास अप्रासंगिक होणार नाहीं असें वाटल्यावरून त्याबद्दल कांहीं माहिती येथें देतों. ऑईल इंजिनें चालणा-या पंपापासून पुढे दिलेले फायदे आहेत. यास मा. णसें फार लागत नाहींत. एकच माणूस पुरतो व तो माणूस । पाणी देण्याचें काम करूं शकते. बांधकाम फार करावें लागत नाहीं. जुनें बांधकाम असलें तर त्याचा ही उपयोग करितां येतो. शेतीसाठीं बैल कमी पुरतात. चारा किंवा दाणा महाग झाला ह्मणून त्यानें कांहीं अडत नाही. चांगला हुशार शेतकरी असल्यास त्यास दुस-या कोणाची जरूरी लागत नाहीं. पंप पुष्कळ जातीचे असतात. सेंद्फ्यूिगल पंप डिस्क पंप सक्शन व फोर्स पंप, डायफ्राम पंप हे त्यांतील मुख्य आहेत. सेंट्फ्यूिगल पंप मध्यें पाणी एका. कॉर्डलेल्या जागेंत जोरानें : पंख्याच्या योगानें फिरावयास लावतात. त्यामुळे पाण्याच्या अंगी जो सेंट्रिफ्यूगल फोर्स (जोर) उत्पन्न होतो स्याचे योगानें पाणी नळीतून वर चढतें. व दुसरे पाणी त्याचे जागिं खालच्या नळींतून वर पोपमध्यें येतें. डिस्क पंपमध्यें दोन डिस्कस (चकत्या) एकमेकांविरूद्ध दिशेनें पण जवळ जवळ जोरानें फिरत असतात यानुळे जी पोकळी उत्पन्न होते त्यांत विहिरिंतील पाणी येतें अशा रितीनें पंप चालतो. सक्शन किंवा फोर्स पंपमध्ये एका बंद जागेंत एक लंजर खालींवर होत असतो. या खालींवर होण्यानें जी पोकळी उत्पन्न होते तीमध्यें विहिरिंतील पाणी येतें. डायफ्राम पंपमध्यें एक डायंफाम झाणजे कातल्याची किंवा दुसरी कसली चकती बसविलेली असते तिचा मधला भाग खालीवर होत असती. यानें जी पोकली उत्पन्न होते तिनें पाणी वर चेतें, हे जे वर पंप सांगितले यांपैकीं डायफ्राम पंप हा अगदींच साघा असतो. यांत बिघडणारा भाग ह्यटला झणजे डायफाम पण हा सहज काढून टाकून नवा बसवितां येती. हा अगद उथल पाण्यालच चालतो पाणी खोल असत्यास चालत
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/76
Appearance