पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( “ላፄ ) ९ ऑईल इंजिनची माहिती. इंजेन थांबल्यावर पुसून स्वच्छ करावें. इंजिन चालू करतानां फुाय व्हीलवर पाय देऊँ नये. तखेंच काम्प्रेशन स्ट्रोकन्टय। वेलेस इंजिन जोरानें फिरवावें. नाहींतर इंजिन मार्गे येऊन फिरविणारास इजा होईल. इंजिन चालू असतानां मधूनमधून जाकेटवर. हात ठेऊन तो कितपत गरम आहे तें पहावें. जर हात टेंकवत नाहीं इतका गरम झाला तर पाणी जास्त सोडावें. एखादा मोडलेला किंवा झिजलेला भाग आणविण्याचा असल्यास त्याचा नुसत्या नांवानें आरडर देऊं नये. कारण कदाचित कारखानदार स्या नांवानें दुसरेंच कांहीं समजत असेल. त्या भागाचें साधं ड्राइंग काढून त्यावर मापें घालून पाठवावें. तसेंच इंजिनचा नंबरही पाठवावा. इंजिनचा नंबर ख्रिलिंडर वर किंवा बेडलेटवर पट्टीनें बसविलला असती, जर इंजिग फार जुनें असेल तर ड्राइंग पाठविणें जरूर असतें. इंजिनला कोणालाही हात लावू देऊं नये. तसेंच मला अमूक येतें तमूक येतें इत्यादि कोणाच्या गप्पांवर विश्वासू नये. जेव्हां इंजिन खोलावयाचें असेल तेव्हां क्रांकला जोडलेलें कमेकटींग राडचें तोंड अगोदर खोलावें. त्यासाठीं क्रांक पुढें आणावी. नंतर कनेक्टींग रॉड हातांत उचलून धरून क्रांक पुढें फिरवावी झणजे रॉड नीट सुटेल. नंतर पिस्टन पुढें ओढून हळूच धका न देतां व न हापटतां उचलून बाहेर काढावा व पुसून खाफ करावा- रिंग बाहेर काढून साफ करून जागेवर बसवाव्या. नंतर व्हालव्ह काढावे व ग्राईड करणें जरूर असल्यास ग्राईड करावे. त्यांच्या हिंपडलनां (दांड्यानां) तेल लावावें. नंतर सिलिंडरमध्यें दिवा घेऊन तो साफ आहे की नाहीं तें पहावें. नंतर व्हालव्ह जाग्यावर बसवावे. याचे अगोदर लाइनरं झिजला आहे कीं काय तें पहावें. पिस्टन रिंगा नव्या घालण्याच्या असल्यास एकदम घालू नये. पहिल्यानें मागची काढून बाकीच्या मार्गे घ्याव्या व पुढें नवी घालावी. अशाच रतिीनें कांहीं दिवसांनीं नवीन घालावी. असें जितक्या रिंगा घालावयाच्या अख़तील तॉपर्यत करावें. असें केल्यानें रंगा बेतानें घांसून नीट बसतात. व्हेपीराइझर व त्यांत तेल. जाण्याच्या वाटा साफ कराव्या. त्यांत घाण बजली असल्यास राकेल लावावें ह्यणजे घाण सुटेल. प्याकिंग बदलण्याचें असल्यास दुसरें प्याकिंग तितक्याच जाडीचें वापरावें जेव्हां कुठचीं भोकें साफ करावयाचीं असतील तेव्हां तीं साफ करितांनां तीं रुंद होणार नाहीत अशी काळजी घ्यावी. निदान तेल जाण्याचीं भेोकं तरी फार काळजीनें साफ करावी. पंप आणि व्हालव्ह राकेलानें साफ करावे. तसेच व्हालव्ह स्त्रीप्टस् वारंवार तपासाव्या. पंपचे ग्लांड न ' गळण्याची खबरदारी घ्यावी. कांहीं बिघडलें असलें व आपल्यास समजलें नाहीं तर तें इंजिनवाल्यांस विचारावें झणजे ते नैोष्ट खुलासा करतील,

  • -