भाग बाविसावा. =Osसायकलचें इंजिन. या भागापर्यंत ज्या इंजिनांचें वर्णन झालें तीं सर्व फोर सायकलच्या तत्त्ववर। बनविलेल्या इंजिनांसंबंधी झालं. आतां दोन (टू) सायकलच्या इंजिन बद्दल लिहितो, मार्गे सांगितलेल्या चार क्रिया ह्मणजे सक्शन काम्प्रेशन इझिशन आणि एक्झास्ट या कसल्याही त-हेचें ह्मणजे टू सायकल किंवा फोरस्रायकलचें इंजिन असलें तरी त्यांत झाल्याच पाहिजेत. पण टू सायकलच्या इंजिनमध्यें या चारी क्रिया एका फे-यांत होतात. टू सायकलचें तत्व समजण्यास एक्सप्लोजन पासून सुरवात केली पाहिजे. असलीं इंजिनें बहूतकरून उभीं व्हरटिकल असतात. त्याच्या खालचा भाग ह्मणजे पिस्टनचा लाइनर जेथून संपतो तेथपासून अगदीं बेअरिंगपर्यंत सर्व आंत हवासुद्धां जाणार नाहीं असें बंद असतें. यांत हवा येण्यासाठीं एक भोंक असतें व तें पिस्टनच्या मार्गे पुढें होण्यानें उघडतें व मिटतें. एक्स्रष्ट्रोजन झाल्यावर जेव्हां पिस्टन खालीं येतो तेव्हां हें भोंक बंद होऊन खालीं राहिलेली हवा दबली जाते. तिचा दाब चार ते पांच पौंड पर्यंत होतो. पिस्टनचा स्ट्रोक सुमारेंद्रे झाल्यावर एक्झास्ट पोर्ट उघडतें व त्याच सुमारास , एअरव्हालव्ह उघडतो. यामुळे खालीं दबली गेलेली हचा सिलिंडरमध्यें जेोरानें येऊन एक्झास्ट वायू बाहेर घालविण्यास मदत होते. आणि सिलिंडरमध्यें फाक हवाच शिल्लक रहाते. ही हवा पिस्टन परत येतो - तेव्हां दाबली जाते. यांतच तेलाची वाफही मिसळून स्फोटकारक मिश्रण (एक्सप्छेोझिव्ह मिक्श्चर) तयार होतें. त्याचा पुन्हां एक्सप्रेोजन होतो व पिस्टन खालों चेतो अशा रीतानें हें इंजिन चालतें. " . या इंजिनांचें विशिष्टस्वरूप असें आहे की त्यानां निराळा व्हालव्ह फार करून मुळींच लागत नाहीं. नुसत्या पिस्टनच्या खालींवर होण्यानेंच सर्व व्हालव्हचीं कायें होतात. यामुळे गव्हरनरची अॅक्शन फार सोपी असते. तसेंच व्हाल’ किवा पंप चालवावयाचे असले तर त्यानां निराळी क्याम शाफ्ट घालावी लागत नाही. क्रांक शाफ्टवरच एक किंवा दोन लागतील त्या संत्र्या (एक सेंट्रिक) लावून काम करतां येतें. यांत खर्च वांचतो व शक्तीही घर्षणांत फुकट जात नाही. तसेंच या इंजिनची गति जास्त असल्यामुळे इंजिनचे भाग लहान करावे लागतात. यामुळे इंजिन हलकें व लहान जागेंत मावणारें असतें. व्हालव्ह थोडे किंवा मुळींच नसल्यामुळे झिज्जून गुडुरुस्त होण्याची भिती कमी असते. यामुळे ते नवे घालण्याचा खर्चही अगदी षोढा अस्रतो,
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/65
Appearance