पान:एक नवें तुफ़ान.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६ ] लोकांस कबूल होण्यासारखी आहे. मागणीच्या वेळीं फूट पडून जितकें नुकसान होईल त्यापेक्षां फूट पडूं नये याकरितां जरी मागणी थोडी कमी केली तरी त्यांत तितकें नुकसान नाहीं, हेंही म्हणणें पुष्कळांस पटेल. देशांत पक्ष नकोत असे नाहीं, पण जेव्हां सर्व पक्षांनी तिसऱ्याकडे मागणी करावयाची आहे तेव्हां सर्व पक्षांनी एकवटून आपापले मतभेद विसरण्यास शिकणें जरूर आहे, या धोरणानें माँटेग्यू-चेम्सफर्ड रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर मिसेस बेझंट यांनी सर्व पक्षांत एकी करण्याचा विशेष प्रयत्न केला. ज्यांना मुंबईकाँग्रसच्या सब्जेक्ट कमिटींतील कामाची माहिती असेल त्यांना या ऐक्याच्या बाबतींत मिसेस बेझंट यांनी किती खटपट केली होती तें सांग- ण्याची जरूरी नाहीं. ऐक्याची जरूर भासल्यामुळे मुंबई काँग्रेसला सर्व राष्ट्रीय पक्ष व अर्धा नेमस्त पक्ष यांचा पाठिंबा होता. नेमस्त पक्षाचे मुंबईचे कांहीं पुढारी, मद्रासचे सर्व पुढारी, संयुक्त प्रांतांतले कांहीं बडेबडे पुढारी यांनी त्या काँग्रेसला दुजोरा दिला होता. जे नेमस्ताग्रणी या काँग्रेसमध्यें आले नव्हते ते सर्व तिच्या विरुद्ध होते असें नाहीं. कित्येक नेमस्त लोक मुंबई काँग्रेसला येण्यास तयार होते, पण त्यांचे कांहीं पुढारी काँग्रेमधून फुटून गेल्यामुळे त्यांस आपल्या मित्रमंडळीस एकदम तोडणें बरेंवाटलें नाहीं. जे नेमस्त पुढारी मुंबईकाँग्रेसला विरोध करीत होते त्यांनी आपली निराळी सभा भरविली. या दोन्ही सभा झाल्यावर ही गोष्ट स्पष्ट झाली की, नेमस्त सभा व मुंबईकाँग्रेस यांमध्यें जरी कांहीं मतभेद असला तरी दोन निराळ्या सभा काढण्याइतका मोठा तो नव्हता. दोन्ही सभांनी माँटेग्यू-चेम्सफर्ड रिपोर्टामध्यें ज्या सुधारणा सुचविल्या त्याही बहुतेक एकच आहेत. त्या पाहून पुष्कळ लोक विचारूं लागले की, जर मतभेद फारसा नाहीं तर नमस्त पक्षानें काँग्रेस सोडण्यास काय कारण आहे ? मुंबईकाँग्रेसनंतर तीन महिन्यांनीं ल्ली काँ झाली. यांत अधिक एकी होण्याची शक्यता उत्पन्न झाली होती. ना. शास्त्री यांचा पक्ष त्या काँग्रेसला मिळाला होता. अशा स्थितीत मुंबईकाँग्रेसमध्ये नेमस्त पुढाऱ्यांशी संगनमत करून ज्या गोष्टी कायम ठरविल्या होत्या त्यांत जर फिरवाफिरव करण्यांत न येती तर ना. शास्त्री यांचा पक्ष दिल्लीकाँग्रेसला कायमचा चिकटता, व मग ना. सुरेंद्रनाथ बानर्जी आदिकरून इतर बाहेर राहिलेले नेमस्ताग्रणीही हळू हळू काँग्रेसश मिळते येते अशी ती संधि होती. ना. शास्त्री यांचा पक्ष म्हणजे 1