पान:एक नवें तुफ़ान.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५ ] त्याची ती बंद ठेवावी, शांतताभंगाचा संशय नाहींसा झाला म्हणजे कायद्या- विरुद्ध सनदशीर चळवळ पुनः सुरू करावी. पण आजच कायद्याविरुद्ध जोराची चळवळ केल्यास लोकांस ढोकें शांत ठेवणे कठीण पडेल व दुष्परि णाम ओढवतील. ज्या कारणास्तव महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची चळवळ बंद ठेविली त्याच कारणास्तव रौलेट कायद्याविरुद्ध चळवळ दोन दिवस बंद ठेवावी असे त्यांचे म्हणणे आहे. लो. टिळक यास इंग्रजी येत नाहीं असें मिसेस बेझंट म्हणाल्याचें बाबू बिपिनचंद्र पाल सांगतात. ही बातमी खोटी आहे. मिसेस बेझंट यांनी त्याचा साफ इनकार करून अशी पृच्छा केली आहे कीं, मीं लो. टिळक यांची इंग्रजी पुस्तकें वाचलीं नाहींत व त्यांची इंग्रजी व्याख्यानें ऐकिलीं नाहींत अशी लोकांची कल्पना आहे कीं काय ? + काँग्रेसतर्फे जें डेप्युटेशन विलायतेस जावयाचें त्याचीं सूत्रे माझ्या हातीं पाहिजेत, ती माझ्या हातीं न दिल्यास मी हिंदुस्थानांतील पुढारी लोकांस डेप्युटेशनवर तुम्हीं जाऊं नका असें सांगेन अर्से बाई म्हणाल्याचें मि. बिपिनचंद्र पाल म्हणतात. देखील निवळ गप्प आहे. ज्या माणसा- जवळ बाई असें बोलल्याचा पालबाबू हवाला देतात त्या गृहस्थानें वर्तमान- पत्रांत असें प्रसिद्ध केलें आहे कीं, मजपाशीं बाई असे मुळींच म्हणाल्या नाहींत, तेव्हां या गोष्टीचें पिष्टपेषण करण्याचें कारण नाहीं. आतां कांहीं.. वादग्रस्त प्रश्नांकडे वळूं. दिल्ली काँग्रेसमध्यें मिसेस बेझंट व राष्ट्रीय पक्षाचे इतर अनुयायी यांचेमध्यें मतभेद उत्पन्न झाला. हा मतभेद उत्पन्न होण्याचें कारण मिसेस बेझंट यांस काँग्रेस आपल्या मुठींत ठेवावयाची होती, पण इतरांनीं लांचे वर्चस्व कमी केल्यामुळे कांहीं तरी कुरापती काढून त्यांनी मतभेद उत्पन्न केला, खरोखरी मिसेस बेझंट व इतर राष्ट्रीय पक्षाची माणसे यांमध्ये मतभेद नाही आहे, व जरी असला तरी बहुमत ज्या बाजूस आहे ती बाजू मिसेस बेझंट यांनीं कबूल केली पाहिजे असे बाईंच्या विरुद्धपक्षाचें म्हणणे आहे. दिल्ली काँग्रेसमध्ये दोन गोष्टींबद्दल मिसेस बेझंट यांचा विशेष कटाक्ष होता. प्रांतिक स्वराज्य ही एक व सर्वोचें ऐक्य ही दुसरी. जर आपणास सरकाराशी कांहीं मागणी करावयाची असली तर ती • एकमुखानें झाल्याशिवाय तिला फारसा जोर येणार नाहीं ही गोष्ट सर्वच