पान:एक नवें तुफ़ान.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ 8 ] तरीं सही काढून घेतली ती मिसेस बेझंट यांच्या अत्याग्रहावरून काढून घेतली असें 'केसरी' चें म्हणणे आहे. हे निव्वळ खोटें आहे. प्रस्तुत लेखकानें या गोष्टीची चवकशी केलेली आहे. ज्यास प्रस्तुत लेखकाची माहिती विश्वसनीय वाटत नसेल त्याने स्वतः चवकशी करून काय तें खरें शोधावें. पण गप्पांवर विश्वास ठेवू नये. रौलेट कायदा हा चांगला कायदा आहे, त्यांत राजनिष्ठ माणसास तक्रार करण्यासारखें कांहीं वाईट नाहीं, अर्से मिसेस बेझंट यांचें मत. अस- ल्याची बातमी ॲसोशिएटेड प्रेसनें प्रसिद्ध केली होती, ती गोष्ट खोटी. असोशिएटेड प्रेसनेही आपली बातमी चुकीची असल्याचें नंतर प्रसिद्ध केले. पण बऱ्याच वर्तमानपत्रानीं पहिली चुकीची बातमी तेवढीच प्रसिद्ध केली, व त्यानें गैरसमजूत मात्र लोकांत पसरली. रौलेट कायदा चांगला आहे, त्यांत कांहीं वाईट नाहीं, असें मिसेस बेझंट यांचें मत नव्हतें व नाही. कायदा पास होण्यापूर्वी त्यांनी आठ दहा लेख त्यासंबंधानें न्यू इंडियांत लिहिले न त्यांतील दोष सविस्तरपणे चव्हाट्यावर आणिले. कायद्यांत कांहीं दुरुस्त्या होऊन तो पुढे पास झाला. या दुरुस्त्यांनी कायद्याची नांगी कांहीं नरम पडली. पण जरी दुरुस्त्या झाल्या असल्या तरी कायदा वाईट आहे, त्यांचा निषेध करणे अगदीं अवश्यक आहे, असेंच मिसेस बेझंट यांनी तो कायदा पास झाल्यावरही दोन अग्रलेख लिहून न्यू इंडियांत प्रतिपादिले होतें. मी विलायतेंत या कायद्याविरुद्ध चळवळ करीन अर्सेच त्यांनीं विलायतेस जातांनाही सांगितले आहे. राजनिष्ठ नागरिकास या कायद्यांत तक्रार करण्याजोगें ( nothing to which a loyal citizen can object ) कांहीं नाहीं हें जें मत त्यांच्या तोंडी घालण्यांत आलें होतें, त्याच्या ऐवजी " ह्या कायद्यांत ज्या दुरुस्त्या झाल्या आहेत त्यांनी त्याचें स्वरूप असें झालें आहे कीं, राजनिष्ठ नागरिकास तो कायदा मोडून धाब्यावर बसवितां येईल असे कलम त्यांत आतां राहिलें नाहीं व म्हणूनच इतर कायदे मोडण्याचा प्रश्न उत्पन्न झाला ” अर्से मिसेस बेझंट यांचे म्हणणें होतें. कायदा चांगला की वाईट याविषयी मिसेस बेझेंट व इतर पुढारी यांचेमध्यें कांहीं मतभेद नाहीं. सर्वोसच तो अतिशय आक्षेपार्ह वाटत आहे. मिसेस बेझंट यांचें इतकेंच म्हणणे आहे की, जोपर्यंत देशांत पूर्ण स्वस्थपणा नाहीं व शांततेचा भंग होण्याचा संभव आहे तोपर्यंत या कायद्याविरुद्ध जी चळवळ कराव--