पान:एक नवें तुफ़ान.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३ ] 'पाडतो. अशी आज पुष्कळांची स्थिति झाली आहे. कित्येकांस आजच्या राजकारणांत मिसेस बेझंट यांचे हेतूंविषयीं संशय येत आहे. कित्येकांना त्यांची बुद्धि चळली अर्से वाटू लागले आहे. राजकारणांत काय किंवा कोठें- ही काय व्यक्ती-व्यक्तीमध्यें मतभेद होणारच. त्याबद्दल कोणी कोणास नांव ठेवण्याचे कारण नाहीं. पण जेव्हां मतभेदाच्या मुळाशीं असद्धेतूंचा संशय येऊं लागतो, जेव्हां मतभेद हे कार्याबद्दल नसून व्यक्तींबद्दल आहेत अशी समाजाची भावना होऊं पहाते, तेव्हां राजकारणाच्या कार्यास एक नवीन विघ्न उत्पन्न होतें. मतभेद योग्य असले तरी कोणत्याही पुढाऱ्यावरील विश्वास डळमळीत होणें ही गोष्ट त्या पुढाऱ्याच्या राजकीय कार्यक्षमतेस कमीपणा आणते. अशा परिस्थितीत वादळामध्यें ज्या गोष्टी जनतेस दिसत नाहींत किंवा वादळाचा फायदा घेऊन ज्या गोष्टीचा मुद्दाम जनतेसमोर विपर्यास्त करण्यांत येतो त्या त्यांचेसमोर शांतपणानें मांडणे हे अगदी आवश्यक होतें. है आवश्यक कार्य उरकण्याचा या लेखकाचा आज संकल्प आहे. या लेखांत राजकीय गोष्टींचा स्वतंत्रपणे विचार करावयाचा नाहीं. तें घर्मजागृतीचें क्षेत्र नाहीं. मिसेस बेझंट यांचे विचारांची संगति समजण्यास जितक्या राजकीय गोष्टींची चर्चा करणें जरूर आहे, तितकीच धरून आम्ही आटपते घेणार आहों. कारण हल्लींच्या राजकीय प्रश्नांवर मत प्रकट करण्याचा या लेखाचा हेतु नसून मिसेस बेझंट यांच्या राजकारणविषयक घोरणावर कांहीं प्रकाश पाडण्याचा हेतु आहे. मिसेस बेझंट यांची मतें सर्वोस मान्य होतील अशी आमची अपेक्षा नाहीं. पण त्यांच्या मतांत कांहीं सुसंगतता आहे, त्यांच्या धोरणांत कांहीं दूरदृष्टि आहे हे वाचकांच्या नजरेस आणून, जरी त्यांचें व मिसेस बेझंट यांचे एकमत झालें नाहीं तरी मिसेस बेझंट यांचेविषयीं उत्पन्न झालेला अविश्वांस दूर करावा व त्यांचे हेतूवर केलेल्या आरोपांचें निरसन करावें अशी आमची अपेक्षा आहे. प्रथम हल्लींच्या वादांत ज्या खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून प्रसृत करण्यांत येत आहेत त्यांचा निकाल करूं. बांडगुळे उपटलीं म्हणजे पुढचें कार्य सुलभ होईल. मुंबईचे शेठ जमनादास द्वारकादास यांनी प्रथम सत्याग्रहाच्या शपथेवर सही केली. पण ती मध्यंतरी काढून घेतली व नंतर पुन: घातली. मध्यं