पान:एक नवें तुफ़ान.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २ ] शांत कृष्णवर्णी मेघराजांच्या अंगावर बिजलीची चमक पढावयास लागून प्राणान्तसमय आल्यासारखा भासतो; व असल्या वादळांत अतिशय कुशल नावाड्याचें तारूंही क्षणोक्षणीं गडप होईल असा सर्व घरकोंबड्या माणसांस रंग दिसूं लागतो. त्याची राजकीय कुंडली आधींच वर्तवून पुष्कळदां त्याचा मृत्युकाळही ते आपल्याशींच निश्चित करितात. पण हा वादळांत सांपडलेला नावाडी जर जातिवंत नावाडी असेल तर तो यत्किंचितही न डगमगतां आपलें कौशल्य सर्वस्व खर्च करून नुसतें आपलें तारूं तरतें ठेवितो. इतकेंच नव्हे तर वादळ नेईल तिकडे न जातां आपण पूर्वी निश्चित केलेल्या मार्गा- नेंच पुढे जात असतो. राजकीय चळवळीचें हें वादळी स्वरूप जरी शान्तपणें प्रगति करूं इच्छि- णाऱ्यास अगदीं नापसंत असले, तरी त्यास इलाज नसतो, व कोणीही राजकीय पुढारी त्याची तक्रार करीत नाहीं. तशी तक्रार करणे म्हणजे सती जाण्यास तयार असलेल्या स्त्रीनें अंग भाजल्याची तक्रार करण्यासारखें हास्यास्पद होय. राजकीय चळवळीचे स्वरूप जोंवर हे असे आहे तोपर्यंत मला वादळांत जावयाचें नाहीं असा हट्ट धरून बसणारास सर्व राजकारणच वर्ज्य करावें लागेल. ज्यास या चळवळींत पडणें असेल त्यानें सर्व धक्के चपेटे मुकाट्यानें सोसले पाहिजेत. गेले चार पांच महिने मिसेस बेझंट या एका मोठ्या वावटळींत सांपडलेल्या आहेत व त्या वावटळीत हिंदुस्थानच्या राज- कारणाचें तारूं मार्गभ्रष्ट होणार नाहीं यासाठीं त्या अविश्रांत मेहेनत करीत आहेत. त्यांच्या वयास आज बहात्तरांवर वर्षे झाली आहेत. इतक्या अवर्धीत त्यांनी कित्येक वादळें पाहिली आहेत व अनेक वादळांत सुकाणा- वरचा हात घट्ट करून आपलें गलबत योग्य मार्गानें वहिवाटलें आहे. या वादळांत त्यांची इतिश्री होणार असे जरी पुष्कळ प्रेक्षकलोक म्हणत असले तरी आपला मार्ग सत्य आहे असा त्यांस भरंवसा आहे, व आपण यांतून नीट पार पहूं अशी त्यांस उमेद आहे. पुढे काय होणार तें पुढें दिसेल, त्याविषयीं आज निश्चित असे कोणी सांगू शकणार नाहीं व सांगितले तरी कोणी ऐक- णार नाहीं. बाई आपली जबाबदारी शिरावर वाहण्यास पूर्ण समर्थ आहेत. पण या वादळामध्ये कित्येकांची दिशाभूल होण्याचा संभव आहे. तुफान माजलें म्हणजे मार्गदर्शक आकाशज्योतींस मेघराज आपल्या जवनिकेत गुंडाळतो व ज्याच्यापाशीं स्वतःचें असें होकायंत्र नाहीं त्यास भ्रमांत