पान:एक नवें तुफ़ान.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२१] .तील त्यांचेपे. रच्या होतून 'कमी चुका होतील असे आम्हांस वाटते. बाईची लौकिक योग्यता व अध्यात्मिक अधिकार हीं जरी अमच्या मतें बरींच असलीं तरी अंधभक्तीनें त्याचें अनुकरण करावें अर्से आम्ही म्हणत नाहीं. ज्यानें त्यानें आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा दिवा हातांत धरून जो मार्ग योग्य दिसेल त्यानें गेलें पाहिजे. पण त्यानें हेंही लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, सदसद्विवेकबुद्धीची ज्योत नेहमीं सारखीच प्रकाशवंत असते असे नाहीं, शांत वेळीं ती जितका प्रकाश देईल तितका प्रकाश वादळांत देत नाहीं. शिवाय नांगऱ्याची सदसद्विवेकबुद्धि, सामान्य माणसाची सदसद्विवेकबुद्धि, स्वार्थत्यागी लौकिक पुढा-यांची सदसद्विवेकबुद्धि, व लौकिक पुढारीपण व अध्यात्म अधिकार हीं ज्या व्यक्तीत एकवटतात अशाची सदसद्विवेक- बुद्धि या उत्तरोत्तर अधिक प्रकाशवंत असतात. उत्क्रान्तिमार्गात सदसद्वि- वेकबुद्धि विकास पावते, अधिक कार्यक्षम होते, व कमी चुका करिते. यासाठीं जरी आपली सदसद्विवेकबुद्धिच कायती आपणांस वाट दाखवूं शकेल, त्या काम जरी दुसऱ्याची विवेकबुद्धि कामास येणार नाहीं, तरी जी काय आपली सदसद्विवेकबुद्धि असेल ती आपण शक्य तितकी शुद्ध, प्रकाशवंत व सामर्थ्यवान् केली पाहिजे. हैं कर्तव्य जर प्रत्येक माणूस करील तर चुकी झाल्यास त्यानें फिकीर करण्याचे कारण नाहीं, अशी सदसद्वि वेकबुद्धि जो मार्ग दाखवील तो प्रत्येकानें बिनधोक अनुसरावा. मग इतर थोर माणसांच्या मताप्रमाणें तो मार्ग योग्य असो किंवा नसो. अशा रीतीनें सदसद्विवेकबुद्धि विकसित करण्याचा मनुष्यानें एकसारखा प्रयत्न केल्यास व चित्तशुद्धीचा मार्ग त्यानें निश्चयानें चोखाळल्यास पुढे असा मौजेचा अनुभव त्यास येतो कीं, उत्क्रांतिमार्गात आपणापेक्षा पुढे असलेल्या माणसांची सद- सद्विवेकबुद्धि व आपली सदसद्विवेकबुद्धि यांचे निर्णय हळूहळू सारखे होऊं लागतात व आपणांत व त्यांच्यांत मतभेद उत्पन्न होण्याचे प्रसंग कमी कमी होत जाऊन शेवटीं अगदीं नाहींसे होतात. ज्याची अशी स्थिति होत असेल तो धन्य होय. T मिसेस बेझंट यांचे डोक्यावरील हल्लींचें वादळ ओसरण्यास आतांच सुरु वात होत आहे. लोकनिंदेच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर आळीपाळीनें बस- ण्याचा प्रसंग त्यांस अनेकवार येतो व अशा दोन्हीं प्रसंगांतून आपल्या बुद्धीस जें खरें दिसतें त्याप्रमाणे वर्तन करीत त्या नेहमीं सुरक्षितपणे बाहेर आल्या