पान:एक नवें तुफ़ान.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२२] आहेत. मि. जे. कृष्णमूर्ति यांचे संबंधीं मद्रास हायकोटीत चालून जेव्हां मिसेस बेझंट यांचे अंगावर बाजू आली त्यावेळेस हिंदी लोकांस तो सर्व बाईंच्या अवतारकृत्याचा पोरखेळ वाटून त्यांचे डोकें या लोकनिंदेच्या वादळांतून वर निघत नाहीं अशी त्यांची अटकळ होती. त्या तुफानाचे वेळीं जर कोणी असें भविष्य सांगता कीं, थोडक्याच अवधींत बाई लोकपक्षाच्या पहिल्या प्रतीच्या पुढारी होतील, व काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बहुतेक एकमतानें निवडल्या जातील तर लोकांनी त्यास वेड्याच्या इस्पितळांचा मार्ग दाखविला असता ही अशक्य गोष्ट जशी लवकरच शक्य झाली तशी आज वाटणारी अशक्य गोष्टही कांहीं काळानें शक्य होऊन आजचें तुफानही लवकर थंडावेल व राजकीय चळवळीचें बाईंचें तारूं सुखरूपपणें बंदरास लागेल अर्से आमच्या दृष्टीस दिसत आहे.