पान:एक नवें तुफ़ान.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२०] तृप्त होणार होती; या गोष्टी केल्याने आपण लोकांस आश्रय होऊं ही साधी गोष्टही त्यांस समजत नाहीं असें त्यांच्या प्रतिपक्षीयांस खरोखरी वाटतें काय ? बाईंनीं अर्से कण्ठरवाने सांगितले आहे, की माझे धोरण कांहीं पुढा- व्यांस मान्य आहे. पण त्याचा सार्वजनिक रीत्या आपण स्वीकार करून जर तें नेटानें पुढे चालवूं तर आपण लोकाच्या रोषास पात्र होऊं हे जाणूनच ते मागे राहिले आहेत. व एकट्यानेंच मीं हें अप्रिय काम करावें असा मजवर प्रसंग आहे. जी व्यक्ति आपल्या मतास्तव आपल्या लोकप्रियतेची होळी करण्यास तयार असते ती अधिक निष्काम की जी लोकांस भिऊन आप- •णास खरें वाटतें तें निर्भीडपणें बोलण्यास मिते ती निष्काम, याचा विचार आम्ही आपल्या वाचकांवर सोपवितों. जर येन केन प्रकारेण लोकांत प्रीति संपादावयाची असती तर लोकछंदानुवर्तनाचा मार्ग बाईंस खुला होता. दिल्ली काँग्रेसमध्यें बहुमतास मिळून, महात्मा गांधींच्या चळवळीची बाजू धरून, निदान त्याविषयीं गप्प बसून बाई अधिक लोकप्रिय झाल्या असत्या. काँग्रेसच्या डेप्युटेशनवर जाण्याचे मतभेदास्तव त्यांनी नाकारले तें जर मतभेद त्या बाजूस ठेवित्या तर जरूर न होतें, व काँग्रेसच्या वतीनें विलाय- तेस जाऊन आपली महत्त्वाकांक्षाही त्यांस तृप्त करितां आली असती. हा सोपा मार्ग त्यांनी सोडिला तो खास लोकप्रियतेकरितां नव्हे. बाईंच्या धोरणा- मुळे व मतामुळे ऑल-इंडिया होमरूलीगमधील कांहीं व्यक्तींस त्या तेथें नकोशा झाल्या व त्यांनीं युक्त्या करून व आंतून सूत्रें ओढून त्यांस राजी- नामा देणे भाग पाडिलें. ही महत्त्वांकाक्षा आहे असें कोण म्हणेल ? मिसेस बेझंट या जशा एका अंगानें राजकारणांतील पुढारी म्हणून प्रसिद्ध आहेत, तशा दुसऱ्या अंगानें अध्यात्मशास्त्रांतील कांहीं अधिकाराची व्यक्ति म्हणूनहि प्रसिद्ध आहेत. ज्यांस त्यांची प्रत्यक्ष माहिती आहे त्यांस ठाऊक आहे कीं, लोकांनी चिकटवलेले पुष्कळसे दोष त्यांच्या अंगीं वसत नाहींत. अध्यात्मशास्त्रांत अनुभवद्वारा त्यांची कांहीं प्रगति झालेली आहे व त्यामुळे त्यांच्या बुद्धीस प्रगल्भता व धोरणास खोलपणा हीं जशीं प्राप्त झालेली आहेत, तसा वृत्तींत निष्कामपणाही आला आहे. त्या चुकण्याचा संभव नाहीं असें नाहीं. पण लौकिक ज्ञान, लौकिक योग्यता व लौकिक सामर्थ्य यांमध्येही बाईपेक्षा कमी असणारी, व अध्यात्मशास्त्राचा उंबरठाही न पाहिल्या- मुळे चित्तशुद्धीचा ओनामाही न शिकलेली माणसें जितक्या चुका कर-