पान:एक नवें तुफ़ान.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १९ ] इंग्लंडच्या लोकांस फसविण्यासाठी सरकार लांडगा आला रे आला अशी खोटी बोल्शेव्हिझमची ओरड करीत आहे, व मिसेस बेझंट या त्यास वेड्या- सारखी मान तुकावीत आहेत असें हिंदुस्थानांतील बहुतेक पुढारी म्हणवि- णारांचें मत पडलें. पण बाईच्या शब्दास पुरा महिना झाला नाहीं तोंच लांडगा खराच आला, व अफगाण सरहद्दीवर काबुलचे अमीर व हिंदुस्थानचें सरकार यांमध्ये युद्ध सुरू झालें. विशाल बुद्धीच्या जोरावर जगाच्या राजकीय परिस्थितीचे यथास्थित अनुम न केल्याचें याहून चांगले उदाहरण मिळणे कठीण. हा उपदेश ऐकण्यांत आला असता व जशी महात्मा गांधी यांनी आपली . चळवळ एकदम तहकूब करण्याची द्वाही फिरविली त्याप्रमाणें जर हिंदु- स्थानांतल्या सर्व विचारी माणसांनी आपले सर्व मतभेद तहकून ठेवण्याच ठरविलें असतें तर केवढी बहार झाली असती ! हा उपदेश तात्काळ ऐक- ण्यांत आला असता तर जनतेवर पुढाऱ्यांचें एकदम वजन पडून लोकांस कमी नुकसान सोसणें जरूर होतें, पुष्कळ लोक तुरंगांत न जाते, पुष्कळ वर्तमानपत्रांची मुस्कटदात्री न होती, पुष्कळ जीव मृत्युमुखीं न पडते. अर्से झालें असतें तर मि. हॉर्निमन मुंबईत राहिले असते, व लोकक्षोभाचें निमित्त करून नोकरशाहीस दडपशाही करण्यास जे कारण मिळालें तें न मिळून दडपशाहीस आळा पडता; शिवाय ज्या लोकांवर या दडपशाहींत अन्याय झाला असेल त्यांस न्याय मिळण्याचा संभवही अधिक झाला असता. एशियामधील कारस्थानावरून हिंदुस्थानांत उत्पन्न होऊं शकणारा धोका किती आहे, याची अचूक अटकळ करणारे मिसेस बेझंट यांसारखे अधिक . पुढारी हिंदुस्थानास लाभले नाहींत हे दुर्दैव होय. आणि या सर्व घोटाळ्यांत मोठ्या आश्चर्याची गोष्ट ही की मिसेस बेझंट, या महत्त्वाकांक्षेस्तव, लोकप्रियतेस्तव, आपलें लोकांवर वर्चस्व राहावें म्हणून आपली मतें प्रतिपादित आहे असें लोक म्हणतात ! जणूं काय महात्मा गांधी यांचे चळवळीस विरोध केल्यानें, दिल्लीकाँग्रेसमध्यें बहुमतानें झालेल्या गोष्टी देशहिताच्या नाहींत असे प्रतिपादिल्यानें, सरकारानें जरी जुलमी रौलट कायदा पास केला असला तरी दोन दिवस दम धरून कडक टीका करूं नका व जरी अधिकारीवर्गानें जुलुमाचीं कृत्यें केलीं तीं कांहीं काळ सोसा असे प्रतिपादल्यानें मिसेस बेझंट यांची लोकप्रियतेची महत्त्वाकांक्षा