पान:एक नवें तुफ़ान.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १८ ] मिसेस बेझंट यांचें न्यू इंडिया पत्र काळजीने वाचीत आले असतील त्यांस हे माहीत आहे कीं, त्यांच्या मतें हा काळ असा आहे कीं, हिंदुस्थानाबाहेर- च्या लोकांकरवीं हिदुस्थानांत अस्वस्थता उत्पन्न होणें असंभवनीय नाहीं. गुदस्त सालीं Citizen Army या विषयासंबंधानें त्यांनीं जे लेख लिहिले होते त्यांत अस्वस्थता उत्पन्न होण्यासंबंधानें त्यांचे मत स्पष्ट करण्यांत आलें आहे. जेव्हां सत्याग्रहाची चळवळ सुरू होऊन त्या चळवळीचें निमित्त करून लाहोर, अमृतसर, दिल्ली, अमदाबाद, विरमगांव इत्यादि ठिकाणीं लोकांकडून अत्याचार व सरकारकडून दडपशाही होत होती त्या वेळेसच मिसेस बेझंट यांनी वारंवार सांगितलें कीं, लोकांच्या या दंग्यांत इतर दंग्या- पेक्षां कांहीं अधिक, कांहीं निराळें असेल अशी शंका येते, नुसत्या राजकीय कारणांनीं चिडलेले लोक रेलवेचे रूळ उपटणें, तारायंत्राच्या तारा तोडणे, सरकारी इमारती व ऑफिसें जाळणे, वगैरे गोष्टी करतील असे मला वाटत नाहीं. यांत बाहेरच्या लोकांचा कदाचित् संबंध असावा. सांप्रतचा काळ माझ्या मताने असा आहे कीं, बाहेरच्या लोकांचें परचक्र हल्लीं येऊं शकेल. अशा प्रकारची मतें प्रतिपादण्याचा जेव्हां मिसेस बेझंट यांनी प्रथम उपक्रम केला तेव्हां अत्याचारास नुकतीच सुरुवात होत होती. कित्येक दिवसपर्यंत मिसेस बेझंट यांचें हें म्हणणें चालूच होतें. अशा आणीबाणीच्या वेळीं लो- कांच्या पुढाऱ्यांनीं, वक्त्यांनीं, लेखकांनीं व वर्तमानपत्रकारांनी सरकार व आपण यांमधला भेद विसरून व भांडणें मार्गे ठेवून सरकारला मनोभावान महत करावी, त्यावर फार कडक टीका करूं नये, कडक टीकेनें अस्वस्थ झालेल्या लोकांच्या कृत्यांस सहजासहजी भलतेंच वळण लागण्याचा संभव असतो, तसे झाल्यास सरकार अधिक कडक होतें, व बुडत्याचा पाय खोलांत या न्यायानें दडपशाहीच्या गर्तेत लोक अधिकाधिक बुडतात. अशी दुःस्थिति टाळण्याकरितां हिंदुस्थानांतील सर्व वजनदार लोकांनी एकमतानें सरकारास आज आधार याबा; जोंवर परकीयांच्या स्वारीची धास्ती आहे, जोंवर अंतःस्थ अत्याचार संशयित स्वरूपाचे वाटत आहेत तोंवर आपण दम घरूं, त्यानंतर आपणांस नोकरशाहीविरुद्ध चळवळं करण्यास मार्ग खुला आहे असा बाईंचा सर्वांस उपदेश होता, तो फारसा कोणास पटला नाहीं. बाई पराचा कावळा करीत आहेत असें पुष्कळांस वाटलें. कित्येक पुढाऱ्यांनी परचक्राचा संभव वाटण्यास तुम्हांस काय प्रमाणे आहेत असा त्यांस सवालही केला.