पान:एक नवें तुफ़ान.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १५ ] तेही मोडूं, कोणते कायदे मोडावयाचे हे आमचें आम्हींच ठरवूं व आम्ही नीतीविरुद्ध वर्तणार नाहीं या एका गोष्टीखेरीज कायदे मोडण्याच्या बाबतींत आम्ही कोठलीही गोष्ट ओळखत नाहीं असा सत्याग्रहाच्या शपथेचा उघड उघड अर्थ होत असल्याने त्याचा अज्ञ बहुजनांवर भलताच परिणाम होईल, त्यांचा बुद्धिभेद होऊन भलत्याच गोष्टी त्यांच्या हातून घडतील . असे मिसेस बेझंट यांचे म्हणणे होतें. सामान्य माणसाच्या मनांत 'कायदा' व 'सुव्यवस्था ' यांविषयीं जी भावना समाजानें उत्पन्न केलेली असते तिचे मुळाशी आघात करून ती निर्बल केल्यास, सत्याग्रही लोकांच्या हातून त्यांची इच्छा नसतांनाही, समाजांत भलतेंच बीज पेरलें जाऊन त्यास अ त्याचारादिकांची तात्काळ कडू फले येतील, अशी मिसेस बेझंट यांस धास्ती वाटत होती. सर्व लोक गांधींइतके विचारी आणि शांत असत नाहींत. या चळवळीचें नैतिक पाठबळ ओळखण्यास जी पात्रता लागते ती बहुजन- समाजास नाहीं. सत्याग्रहाच्या मार्गात कांहीं अडचण उत्पन्न झाल्यास हा अज्ञ समाज खवळून ही चळवळ भलत्याच मार्गावर नईल असें बाईनी अगो- दरच वारंवार प्रतिपादिलें होतें. महात्मा गांधी यांचें यावर असें म्हणणे पडलें कीं, हिंदुस्थानांतल्या लोकांवर अध्यात्मवृत्तीचा पगडा पुष्कळ आहे, च सत्याग्रहाच्या चळवळीचें तपःसामर्थ्य असे आहे कीं, असले दुष्ट परिणाम होणारच नाहींत. इतकेंच नव्हे तर, जर ते होण्याचा संभव असेल तर तोही सत्याग्रहाच्या प्रभावानें नाहींसा होईल ! मिसेस बेझंट यांचें दुसरें अर्से म्हणणे होतें कीं, सर्व जगाची व हिंदुस्था- नची स्थिति इतकी अस्वस्थ झालेली आहे कीं, आज परिस्थिति फार नाजूक झाली आहे. चारपांच वर्षभर माजलेली लढाई, राशयन राज्यक्रान्तीनंतर सर्वत्र पसरणारी बोल्शेविझमची लाट, जगभर झालेली महागाई, हिंदुस्थानांतील अवर्षण, हिंदुस्थानांत व इतरत्र झालेले मजुरांचे संप, इत्यादि अनेक कार- गांनी, सहज क्षुब्ध होईल अशी लोकांची मनःस्थिति झालेली आहे. सर्व प्रकारें हवालदील झालेल्या लोकांत ही चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू केल्यास अस्वस्थता माजण्यास उशीर लागणार नाही. या दोन कारणांस्तव गांधी यांच्या विरुद्ध असणारे आपले विचार, भीडमुरवत न धरतां व आपलें म्हणणे लोकांस कितपत गोड वाटेल हा स्वार्थी विचार मनांत येऊं न देतां मिसेस बेझंट यांनी एकसारखे प्रतिपादिलं.