पान:एक नवें तुफ़ान.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही वर लिहिलेली विचारसरणी मिसेस बेझंट यांची आहे. ती आम्हांस बरोबर वाटते. पण ती जरी कोणास बरोबर वाटत नसली तरी ती इतकी "वेडगळपणाची खास नाहीं कीं, तीसाठीं मिसेस बेझंट यांच्या प्रामाणिक- पणाबद्दल संशय घेण्याची आवश्यकता आहे. मिसेस बेझंट यांच्या बुद्धि- मत्तेचीच परीक्षा करावयाची असली तर नुकत्याच झालेल्या गोष्टीवरून त्यांचीच बुद्धिमत्ता जास्त विश्वसनीय आहे असे दिसून येतं. ज्याच्या बो- लण्याची प्रचीति येते तो मनुष्य अधिक विश्वसनीय समजला पाहिजे ही कसोटी मिसेस बेझंट व इतर पुढारी यांस लावून पाहिली असतां मिसेस बेझंट या जशा कसास उतरतील तसे इतर उतरणार नाहीत हें कोणाही निःपक्षपाती मनुष्यास कळून येण्याजोगे आहे. सैन्याच्या पुढान्याप्रमाणे-से- नापतीप्रमाणे- राष्ट्राच्या पुढाऱ्याच्या अंगी नुसतें शौर्य असून भागत नाहीं. शौर्याबरोबर धोरण आणि शहाणपणा हे गुणही त्याचे अंग अवश्यक अस तात. नेपोलियन जितका शूर होता तितकाच किंवा त्याहून अधिक तो धोरणी होता म्हणून तो खरा पुढारी. ऑस्टरलीझची लढाई होण्याचे अगोदर तेथील जागेची टेहेळणी करतांना, येथें शत्रू तळ देईल, या टेकडीवर तो अमुक हिकमती योजील, या जागीं मी त्यांवर अमुक डावपेंच टाकीन, व या चढावावर तो मला शरण येईल असा त्यानें आपल्या धोरणावर अजमास बांधिला, इतकेंच नव्हे तर त्या धोरणाच्या अनुरोधानें त्यानें कांहीं टेकड्यां- जवळील जागा खणून आपणांस हवी तशी केली व पुढें नेपोलियनच्या अजमासाप्रमाणे सर्व गोष्टी नाटकांतल्या संविधान काप्रमाणे घडून येऊन त्याची फत्ते झाली म्हणूनच तो मोठा सेनापती. जी गोष्ट सामान्य लोकांस समजते तीच गोष्ट जर पुढान्यास समजत असेल तर सामान्य मनुष्य व लोकनायक यांत फरक काय ? सामान्य मनुष्यास जी गोष्ट समजत नाहीं ती ज्यास समजते व त्याप्रमाणे धोरण बांधून जो आपले दूरदर्शित्व खरें करून दाखवितो तो खरा पुढारी होय. झाड पाहिल्यावर त्याची फळे तोडणारा मनुष्य बागवान नव्हे तर बीज पाहिल्यावर जो वृक्षाचा अचूक अजमास करतो तो खरा बागवान होय. विजेचा प्रचंड गडगडाट, ढगांची भयंकर काळोखी व समुद्राचा नितान्त क्षोभ दृष्टिगोचर झाल्यानंतर वादळांत आपण सांपडलों आहों हैं लक्षांत येऊन जो सुकाणाकडे धांव घेतो तो नावाडी नव्हे तर क्षितिजावर टीचभर रुंदीचे ढग आलेले पाहून त्याच्या लक्षणावरून