पान:एक नवें तुफ़ान.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२ ] बाजूचें करण्याच्या मार्गास लागावें व त्यांत त्यास यश आल्यास पूर्वीचे ठराव फिरवून आपल्या मताचे ठराव पास करून अमलांत आणावे हीच अशाप्रकारच्या सर्व राजकीय संस्थांची रीत आहे. शेवटला प्रश्न सत्याग्रहाचा राहिला. त्यासंबंधानें मिसेस बेझंट यांनी जें धोरण स्वीकारलेले आहे, त्याविषयीं पुष्कळ चुकीच्या गोष्टी लोकांत पसर- लेल्या आहेत. तेव्हां या मुद्याचा विचार करतांना प्रथम वस्तुस्थितीचे निवे- दन करणें जरूर आहे. रौलट कायदा पास होण्याचे अगोदरच सत्याग्रहाच्या चळवळीचा उपक्रम करण्यांत आला होता. त्या वेळी मिसेस बेझंट यांनीं सत्याग्रहासंबंधानें आपलें धोरण काय ते जाहीर केलेले आहे. त्या तत्त्वतः सत्याग्रहाच्या ( अर्थात् Passive Resistance ) च्या विरुद्ध नाहींत. सत्या- ग्रह म्हणजे एकादी आपणांस चुकीची वाटणारी गोष्ट कायद्यानें ठरविली असतां ती मोडून कायद्यांतील शिक्षा शांतपणे भोगणे हा निश्चय होय. या 'प्रकारास महात्मा गांधी यांनीं आध्यात्मिक व निवृत्तिमार्गाचें उच्च स्वरूप दिलें आहे. ते क्षणभर सोडून देऊन सामान्य जनतेस जो सत्याग्रहाचा साधा अर्थ कळतो तो घेतल्यास तो आणि Passive Resistance हीं एकच आहेत. मिसेस बेझंट या Passive Resistance च्या विरुद्ध नाहींत इतकेच नव्हे तर अनेक वर्षांमागे सर चार्लस बॅडला व मिसेस बेझंट यांनीं Knowlton pamphlet नांवाचें विलायतेंत सरकारने मना केलेलें पुस्तक छापून त्यांनीं स्वतः सत्याग्रह अवलंबिलेला होता ही गोष्ट इंग्लंडांतील गेल्या शतकाच्या शेवटच्या भागाचा इतिहास माहीत असलेल्या सर्व लोकांस अवगत आहे. एकादा कायदा अन्यायाचा असला व तो पाळणे एकाया शुद्धसत्त्व पुरुषास आपल्या विवेकबुद्धीच्या विरुद्ध आहे असे वाटत असले तर त्यानें कायदा मोडून कायद्यांत सांगितलेलें प्रायश्चित्त निमूटपर्णे भोगावें असा हा मार्ग आहे. असे केल्यानें त्या वाईट कायद्याकडे जनतेचें लक्ष जातें, व शिक्षणानें उच्च व आचरणानें चोख असणारे पुष्कळ प्रजाजन जर कायदा मोडण्यास तयार झाले तर जनतेची सहानुभूति ते आकर्षू शकतात, सरकारचें हंसें होतें व कधीं कधीं पुष्कळ माणसांस तुरुंगांत घालणें अडचणीचेंही होतें व अशा रतिनेिं तो वाईट कायदा रद्द करण्यांत येतो. पण माहात्मा गांधींनी जो सत्याग्रह सुरू केला तो यावरील प्रकारापेक्षां एका अत्यंत महत्त्वाच्या बाबतींत भिन्न होता. रौलट कायदा पास होण्याचे अगोदर त्यांत ज्या दुरुस्त्या कर