पान:एक नवें तुफ़ान.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११] आपल्या धोरणाच्या विरुद्ध असतांही काँग्रेसनें मान्य करणें शहाणपणाचें नाहीं. The Congress must take an Imperial and not a Provincial view असे काँग्रेसमध्यें मि. सी. पी. रामस्वामी ऐयर यांनीं जें बोलून दाखविलें त्याचें इंगित हेच होय. दिल्ली काँग्रेसविषयीं मिसेस बेझंट यांचे विरुद्ध आणखी एक मुद्दा पुढे करण्यांत येतो. तो असा की, जर दिल्ली येथें बहुमत बाईंच्या विरुद्ध होतें तर त्यांनींही बहुमताप्रमाणे चालले पाहिजे असें म्हणणें म्हणजे लोकसत्ते- विषय, राजकीय संस्थांविषयीं, तसेंच बहुमताच्या अधिकाराविषयीं अ- क्षम्य अज्ञान प्रकट करणे होय. जर बहुमत कोणाच्या विरुद्ध असेल तर त्या संस्थेवर विरुद्ध मंडळीचे वर्चस्व चालूं नये, त्या संस्थेच्या नांवाचा आपल्या मतसमर्थनार्थ त्या मंडळीस उपयोग करण्याचा अधिकार नाहीं, बहुमताप्रमाणे ठराव पास व्हावयास पाहिजे, व बहुमताच्या ठरावांची अंमलबजावणी करण्याचा त्या संस्थेस हक्क आहे; येथपर्यंत आम्हांस. सर्व कबूल आहे. पण जें मत आपणास अमान्य आहे, तें बहुमतास योग्य दिसतें म्हणून आपणही मान्य केले पाहिजे, त्याविरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा चळवळ करण्याचा कोणास हक्क नाहीं असा त्याचा अर्थ होत नाहीं. कायदे 'कौन्सिलांत लोकांच्या पुढाऱ्यांस बहुमत प्रायः मिळत नाही म्हणून ते त्या- विरुद्ध आपापल्या चळवळी करीत नाहींत काय ? ॲस्क्रिय साहेबांस आज बहुमत मिळालें नाहीं, म्हणून ते लॉइड जॉर्ज यांची मतें कबूल करतील कीं काय ? ते आपल्या मतसमर्थनार्थ चळवळ करितील व त्या चळवळीसाठी सभा भरवितील, लेख लिहितील, संस्था उभारतील व अशा रीतीनें बहुमत आपल्या बाजूस वळविण्याचा यत्न करतील. त्यांस प्रत्यवाय नाहीं. ज्या पक्षास बहुमत नाहीं त्यानें बहुमत आपल्या पक्षास मिळविण्याचा त्या सं- स्थत राहून प्रयत्न करावा हा त्या पक्षाचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा हक काढून घेतल्यास बहुमतावर चालणाऱ्या संस्थांची प्रगति खुंटून त्यांचे बारा वाजतील. काँग्रेससारख्या सर्वराष्ट्रीय संस्थांत अनेक पक्ष असावयाचे, त्यांत आज या पक्षाचें बहुमत तर उद्यां त्या पक्षाचें बहुमत, असा प्रकार चालाव- याचा. ज्याचें बहुमत असेल त्याचे ठराव काँग्रेस पास करील व ते काँग्रेस ठराव म्हणून समजले जाऊन काँग्रेस त्यांची अंमलबजावणी करील. हे ठराव ज्या पक्षास मान्य नाहींत त्यानें नवीन खटपट करून बहुमत आपल्या