पान:एक नवें तुफ़ान.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ९ ] आहे; माँटेग्यु स्कीमचा विध्वंस करणे जरी कठीण नसले तरी विध्वंस झाल्यावर या दोहोंपेक्षाही कमी भरींव दान पदरीं पडण्याचें भय आहे; अशा स्थितींत माँटेग्यू योजनेची चौकट कबूल करून त्यांत आपणास पाहिजे त्या दुरुस्त्या बसवाव्या म्हणजे आपल्या मागणीस सरकारास नाका- रणे कठीण पडेल असा सर्व राष्ट्रानें एकमतानें विचार केला. जरी Diarchy किंवा सत्ता-विभाग हिंदुस्थानांतील लोकांस प्रिय नव्हता तरी तो माँटेग्यु योजनेच्या चवकटीसारखा असल्यामुळे तो स्वीकारावा असें पुढा- ज्यांनी ठरविले. Diarchy च्या मार्गानें लोकांच्या हातीं हळू हळू कारभार देण्यास आम्ही तयार आहों असें जर सरकारी रिपोर्ट म्हणत असेल, तर हें Diarchy चें तत्त्व आम्हांस मान्य आहे, आम्हीं तें प्रांतिक सरकारांत स्वीका- रण्यास तयार आहों; पण तुमचेंच हें तत्त्व तुम्ही वरिष्ठ सरकारासही लाविलें पाहिजे अर्से म्हणण्याची लोकांस मुभा पाहिजे होती. माँटेग्यु साहेब वरिष्ठ सरकारांत लोकांस कांहीं सत्ता देण्यास तयार नव्हते तेव्हां त्यांचेंच तत्त्व प्रांतिक सरकारांत कबूल करून ते त्यास वरिष्ठ सरकारास लागू कर- ण्यास लावणें अधिक संभवनीय आहे असा पुढाऱ्यांनी पोक्त विचार केला. वरिष्ट सरकारांत लोकांस थोडी तरी सत्ता मिळून त्यांचा तेथें चंचुप्रवेश आज न झाला तर पुढे अशी संधि लवकर येणार नाहीं; व एकदां चंचु प्रवेश करून ठेविला असला म्हणजे पुनः पुनः चळवळ करून वरिष्ट सरका- रांतही लोकांस हातपाय पसरावयास सांपडतील; चंचुप्रवेश आज न झाल्यास वरिष्ठ सरकारच्या सुधारणेचा दरवाजाच अजी बंद होऊन तो पुनः उघडणे कठीण जाईल; तेव्हां हा चंचुप्रवेश वरिष्ठ सरकारांत होण्या- • साठीं सत्ताविभागाचें तत्त्व प्रांतिक सरकारांत आपण मान्य केले पाहिजे ही विचारसरणी सर्व पुढाऱ्यांस पसंत पडली व तिच्या अनुरोधानें मुंबईकाँग्रेसचें धोरण राहिलें होतें. अशा स्थितीत प्रांतिक स्वराज्य आतांच पूर्ण पाहिजे अशी मागणी करून जर Diarchy आपण फैंटाळून लाविली तर तीच Diarchy वरिष्ठ सरकारांत आपण कोणत्या तोंडानें मागणार ? Diarchy व्यवस्था लोकांनी मान्य केल्यास सरकारचें ते मूळ तत्त्व असल्यानें, लोकांनी जोर धरल्यास तें वरिष्ठ सरकारांतही मिळण्याचा संभव आहे; पण ते अमान्य केल्यास फार झालें तर सरकार प्रांतिक स्वराज्य देईल पण वरिष्ठ सरकारांत लोकांचा हात शिरकू देणार नाहीं. असा प्रांतिक सत्तेचा