पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काटा' असा समाज आपणास हवा आहे की, दगडफेक करणाच्या, सुळावर खिळे ठोकणाच्या लोकांनाही लेकरं अज्ञानी आहेत, त्यांना क्षमा कर' म्हणणाच्या येशू ख्रिस्तास अभिप्रेत असलेला क्षमाशील, करुण समाज?
 माझ्या मनात हे सारं विचारांचं वादळ निर्माण व्हायला अलीकडच्या अनेक घटना कारणीभूत आहेत.
 अमेरिकेतील ओक्लोहोमा सिटी येथील एका इमारतीवर बाँब टाकून २१ कोवळ्या बालकांसह १६८ जणांचे प्राण घेणा-या टिमोथी मॅक्वीला देहदंडाची शिक्षा दिली तेव्हा तो पंधरा एक दिवसांपूर्वी विषण्णपणे म्हणाला होता, "मीच माझ्या दैवाचा आणि आत्म्याचा स्वामी आहे".... अन् ते खरं होतं.  युवराज दीपेंद्रने चक्क आई-वडलांसह नऊ जणांची हत्या केली हे सिद्ध झालं तरी जनता त्याला निर्दोष मानत आली. जनतेच्या लेखी तो हृदयसम्राटच होता. मनात सूत्र पक्क होतं...."King never wrong.'
 पश्चिम जपानच्या इकेदा शहरातील एका शाळेत एका मनोरुग्णाने घुसून सपासप चाकूचे वार केले नि आठ निष्पाप मुलं मृत्युमुखी पडली...
 तिकडे अमेरिकेत शाळकरी मुलानेच बंदूक चालवली व आपल्या समवयीन मित्रांचा बळी घेतला...

 या सर्व घटनांत एखादा अपवाद वगळता लोकक्षोभ तीव्र, आक्रमक, हिंसक होता...मध्ये इचलकरंजीत तर छेड काढणाच्या एका सडकसख्याहरीला स्त्रियांनी ठेचून मारलं...परवा बालक हत्याकांडात रेणुका शिंदे, सीमा गावित भगिनींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर वृत्तपत्रांनी राक्षसीण, डाकीण म्हणून त्यांची संभावना केली.... जनतेतील काहींनी साखर वाटून फाशीचा जल्लोष केला... कुणी म्हणाले, 'इथच भरचौकात फाशी द्यायला हवी.'.... धिंड तर आज पोलीस रोज काढतच आहेत... कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत... पोलिसांचं संचलन व्हायला काश्मीर, पंजाबची पेटती, धगधगतीच जमीन लागते असं नाही... साता-यासारखे थंड शहरही त्यांना आमंत्रण देतं... या साच्या घटनाक्रमांकडे पाहात मी मात्र रोज बेचैन, अस्वस्थ होत आहे... मला असं लक्षात येतंय की अलीकडे समाजमन हिंसक, अनुदार, वैर, द्वेषांनी पछाडलेलं, पिसाट होतंय... महात्मा गांधींची अहिंसा, भगवान बुद्धांचा संयम, येशू ख्रिस्ताची क्षमाशीलता यांना आपण रोज तिलांजली देत खुनी होत आहोत... ‘खून का बदला खून' हे एकदा जगायचं सूत्र ठरलं की मग आपणास लोकसंख्या कमी करायला कुटुंब नियोजनाच्या कल्याणकारी कार्यक्रमाची गरज राहणार नाही. कारण आपला कार्यक्रम ठरून जाईल... खून, मारामारी, गोळीबार, फाशी, बलात्कार, बदला... यात आपल्याला

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६७