पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही संकल्पना मागे पडेल. व्यक्तिविकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट बनेल. अंकदानाऐवजी श्रेणी निर्धारण पद्धती, कौशल्यमापन, प्रात्यक्षिके, भेटी, प्रकल्प मुलाखती, स्वयंअध्ययन ही अध्यापनाची माध्यमे बनतील. परीक्षेपेक्षा वर्षभराचे कार्य महत्त्वाचे होईल. आंतरशाखीय शिक्षणास प्राधान्य दिले जाईल. थोडक्यात सांगायचे तर नवशतकातील शिक्षण म्हणजे गुंतवणूक व लाभ अशा सरळ हिशेबाची एक वस्तुनिष्ठ व्यवस्था असेल. निकाल व परिणाम हे या व्यवस्थेचे निकष असतील. गुणवत्ता या व्यवस्थेचा पाया असेल.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१८