पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मूल्यमापन प्रक्रिया या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीवर ठरेल. म्हणजेच विद्यार्थ्याला शाळा, शिक्षण, निवडण्याचा अंतिम अधिकार असेल. त्यामुळे शिक्षकास सतत उद्याचा विद्यार्थी कसा असेल याचे भान ठेवून आजच त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता व कौशल्ये आत्मसात करावी लागतील. तुमचे अध्ययन व अध्यापन जितके निर्दोष तितके शाळेचे कार्य उत्कृष्ट मानण्यात येईल. इतर शाळा नि शिक्षकांच्या वेगळेपणावर तुमची गुणवत्ता मोजली जाईल.
संस्थात्मक नि व्यक्तिगत शिक्षण
 शिक्षण व्यवसायातील अत्युच्च यश हे संस्थाचे लक्ष्य राहील. त्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यपद्धतीस असाधारण महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे वर्तमान व्यवस्थेचा निरंतर विकास करीत आवश्यक ते बदल स्वीकारण्याकडे संस्थांचा कल राहील. सतत नव्याचा अंगीकार व्यक्ती व समूहस्तरावरील कार्यक्षमता, समस्या निवारणाची कार्यपद्धती, संशोधन व विकासाचे अनन्यसाधारण महत्त्व, अनुकरणीय उपक्रम यांवर संस्था विद्याथ्र्यांना आपणाकडे आकर्षित करीत राहतील. याचा फायदा सेवादर्जात सुधारणा, विद्यार्थिसंख्येत वाढ, चुकांचे विसर्जन, सततच्या यशाचे चक्र, कार्यक्षमतावर्धन, सामाजिक सामीलकी इ. दृष्टीने संस्थेस होईल.
 शिक्षक, कर्मचारी यांच्या पुढे जाऊन काळजीवाहक, समुपदेशक, परिचारक, आहारतज्ज्ञ, आरोग्य निरीक्षक, उपचारतज्ज्ञ अशी पदे शाळामहाविद्यालयांत निर्माण केली जाऊन शिक्षणाइतके महत्त्व विद्यार्थी संगोपन आणि संवाद समजून घेण्याला येईल. त्यासाठी कर्मचारी, शिक्षक नियुक्ती करार पद्धतीची असेल. संस्थांमध्ये शिक्षक अशा उंच पातळीवर परस्परांकडून व परस्परांना शिकण्या-शिकविण्यावर भर असेल. प्रशिक्षण व शिक्षणाचे आधार इंटरनेट व उपग्रह असतील. बहुगुणी शिक्षक व कर्मचा-यांना प्राधान्य दिलं जाईल. संस्थाचालक पातळीवर अभिनव उपक्रमशील शिक्षक व कर्मचारी यांना अधिक पसंती मिळेल.

 भविष्यकाळात गुणवत्ता संवर्धनासाठी संस्था लवचिकतेचे धोरण स्वीकारतील. भविष्य हे त्यांचे लक्ष्य असेल. प्रशासनात वस्तुनिष्ठतेस असाधारण महत्त्व राहील. जनसंपर्कात संस्थांचा भर राहील. शिक्षणव्यवस्था प्रक्रियाकेंद्रित होईल. निकालांवर नोकरी, वेतन, बढती इत्यादी गोष्टी ठरविल्या जातील. ज्यांना गुणवत्ताप्रधान शिक्षण हवे आहे, असा समाज बहुसंख्य असेल. पैसे देऊन शिकण्यावर भर राहील. गुणवत्ता संवर्धन म्हणजे केवळ परीक्षा निकाल

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१७