पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थन आहे. त्यामागे उच्च शिक्षणातील स्वायत्त व लोकतांत्रिक व्यवस्था हाणून पाडण्याचाच डाव आहे. उच्च शिक्षणातील स्वायत्ततेसंबंधी नेमलेला ‘कॅब समिती अहवाल' ही शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता व सार्वजनिक उत्तरदायित्व यांत समन्वय निर्माण करण्यास अपयशी ठरला आहे, असे त्यांनी माफक प्रयत्न जरूर केले आहेत.

 त्यामुळे आज धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक आणि समानतेसारख्या मूल्यांवर आधारित अशा एका व्यासपीठाची गरज निर्माण झाली आहे. ज्याद्वारे घटनेच्या चौकटीत राहून लोकतांत्रिक नियंत्रण व्यवस्था अस्तित्वात येईल. त्याद्वारे शिक्षण संस्था नि समाजात एकात्मिक नाते निर्माण होणे गरजेचे आहे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१११