पान:उषःकाल.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नशा अमृताची


भरलास देवा साऱ्या चराचरी
आहे तुझ्या घरी । न्याय कुठे ? ।।


  

तुला म्हणे देवा लक्ष लक्ष डोळे


  

पेंगताती खुळे । नको तेव्हा


आशीर्वाद - कृपा असा तुझा न्याय


मानेवरी पाय । अश्रापाच्या ॥


  

उन्मत्त उदंड भूमीलाही दंड


  

माजले हे पुंड


म्हणती दांभिक आम्ही पुण्यवंत


त्यांचा कृपावंत । तूच देवा ॥


  

धनिकांच्या घरी तुझ्या तसबिरी


  

चाले सावकारी


शाय - विश्वास पाळेनात कोणी


भरतात गोणी । पापाची ती ॥


  

वर - आशीर्वाद, आण वा वचन


  

सारे अर्थशून्य । करतोसी ॥


फुलता निष्पाप कोमल ते फूल


पाडतोसी भूल । वणव्याची ॥


  

दुबळे पिडित आले आसयाला


  

देई त्यास थारा । तोच मरे


उषःकाल । २