पान:उषःकाल.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ऋतुरंग

लावून जीव होते तव मोकळ्या सूरास
घेऊन गंधवलये कवटाळले ऊरास


केलास बोलबाला, मांडलीन् स्वप्नरास
गंधून धुंद झाली, मम प्रीतीची मिरास


ओतून रम्य भाव, केलीस तू आरास
येणार मीही होते त्या दिव्य मंदिरास


तडिता आघात झाला मम नांदत्या घरास
लावी मशाल कोणी हळुवार अंतरास


वळणावरी उद्याच्या, स्वप्नील पुष्परास
डोळयात पाहते मी त्या प्रीत आगरास


ऋतुरंगचिव जेव्हा ये स्वप्न मंदिरास
विसरून रागरंग, उधळून रंगरास


येशील तू फिरोनी या भाव मंदिरास
उभी मी, आतुर आहे, मिळण्यास सागरास !



उषःकाल । १