पान:उषःकाल.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरमाई


सानुलाच ओटा माझा
सानुललीच याद
मनी उचंबळु जाता
भिजविते घाट
बाहुली छकुली माझी
बाहुलीचा यार
लुटुपुटीच्या लग्नात
वहऱ्हाड्यांचा थाट
माऊली मवाळ माझी
माऊलीची याद
जाई मायेने भिजुनी
सुरेलशी साद
डाफरली माझ्यातली
लुटुपुटी आई
‘नक्को ! बाई मारू हाक
इथे लगीन घाई
तुझी सदा रांधा - वाढा
नेहमीचीच घाई
माझ्या मागे ढीग कामे

मीच वरमाई !,

उष:काल । ५०