पान:उषःकाल.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिव्हार

तुला गीत गाता गाता
मीच वेडे गीत झाले
पंच पंच उषःकाली
भूपाळीत सामावले


फुले गुंफिता गुंफिता
फल आपणची झाले
तुझ्या जिव्हारा लागून
तुझी होऊनिया गेले


ज्योत ज्योतीने लाविता
वेडी मीच ज्योत झाले
तुझ्या स्नेहात भिजुनी

अशी एकरुपा आले

उषःकाल । ४९