पान:उषःकाल.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रा. डॉ. सौ. नलिनी महाडीक विवाहानंतर दहा वर्षांनी महाविद्यालयीन शिक्षण. १९८२ साली शिवाजी विद्यापीठाच्या एम्. ए. परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम. उमागिरीश व माधव ज्युलियन पारितोषिकांचा मान. १९८३ साली रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापिका म्हणून सेवाप्रवेश. प्रसिध्द साहित्य : 'रानवारा' (ग्रामीण कथा संग्रह ) 'लागीर' (ग्रामीण कथा संग्रह ) 'प्राची' (काव्य संग्रह) कथास्पर्धेची व काव्यस्पर्धेची अनेक पारितोषिके प्राप्त. 'मराठी राजकीय कांदबरी' (१८८५ - १९८५) या प्रबंधास शिवाजी विद्यापीठाकडून पीएच्. डी. पदवी प्राप्त. सध्या छ. शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे मराठी वाङ्मयाच्या प्राध्यापिका.