पान:उषःकाल.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चंद्रबिंब

त्या शारदरात्रीला मी
ही अशी बरसले होते
सर कोसळली वळीवाची
डोळेही पुसले नव्हते


  तू शब्द दिला जरी नव्हता
  मन माझे सांगत होते
  येशील येशील म्हणुनी
  मी डोळे मिटले नव्हते


त्या अबोल खिडकी मधुनी
मी तुला पुकारीत होते
दर्शनी अधीरी होऊन
बेचैन बावरी होते
व्याकुळ


  मम टपोर नजरे पुढती
  तव चंद्रबिंब ते दिसले
  अन् खट्याळ नजरेने ते

  मज पाहून गाली हसले !

उष:काल । ४८