पान:उषःकाल.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वात्सल्य


आषाढ सरीचा पाऊस झडावा
सारे चिडीचिप गारवा पडावा
चिखल-पाण्यात नागडेच पाय
घराकडे धाव वावगे ते काय ?


  कोवळ्या कदाची छबी डोळ्यापुढे
  फाटक्या शेल्यात राजस पहुडे


कातर सांजेला हंबरते गाय
साद पाडसाची, उधळते पाय


  जरी दयाधन दुर्बला घातक
  पाडितो अकाल, घायाळ चात क
  परी अरूपाचे रूप कृष्ण कान्हा
  वासरा पाहुनी उचंबळे पान्हा


चिमणीच्या दारी तिची चिवचिव
विनवी पावसा 'माझी तुला कीव


  आम्हा दुर्बलांचा तूच दयाधना

  पिलांना आणीन पाणी-दाना'

काल । ४७