पान:उषःकाल.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आस

जरी बोलले मी कटु वा वावगे
  जाऊ नको रागे । परस्पर ॥

तुझ्या वाचून मी सदाच दुभंग
  होऊन अभंग । सांधशी तू ॥

माझ्यासाठी तूच आकाश धरणी
  कोणाची करणी । तारी मज? ॥

तुझ्या लोभापायी झाले अगतिक
  मागितली भीक । निलाजरी ॥

तुझी माझी भेट एकदा घडावी
  सदाची बुडावी । ताटातूट ॥

घडेल एकदा   तुझा माझा संग

  होईन निसंग । वाळवंटी

उषःकाल । ४६