पान:उषःकाल.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंकुर


त्या श्रावण संध्याकाळी
तरुतळी उभी मी होते
हळदुली उन्हाची दुलई
मऊ तुषार भिजवीत होते

  सावळचा पिसाऱ्या खाली
  मन विभोर झाले होते
  पाण्याच्या थेंबावरती
  अनवाणी नाचत होते

गुलमोहर फांदी वरती
रावे ते थांबून होते
वाऱ्याच्या लाटांवरुनी
अलगुज निनादत होते

  विश्रब्धच होती धरती
  अंकुर हुंकारत होते
  सांजेला करूनी टाटा हात
  फांदीस पुकारत होते

आश्वासून सांगत होते
आम्हीच उद्याचे नेते
त्या श्रावण संध्याकाळी

मजलागी गमले होते

उषःकाल । ४५