पान:उषःकाल.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सवाल


दान देण्या दाता आला
जीव माझा संकोचला

  माझा फाटका पदर
  त्याच्या पुढे पसरला

परी दान देण्या दाता
भला विसरून गेला

  नाही त्याची खंत मला
  परी माझ्या पदराला

साऱ्या जगताचा राणा
खार लावुनिया गेला

  येई धावुनी स्वारी त्याची
  असे ऐपत मोठी ज्याची

धन पाहुनी कृपा त्याची
'दयाधन' कीर्ति त्याची

  कडा संकटाचा येता

  नवसाची लाच घेतो

उष:काल । ४२