पान:उषःकाल.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुर्ची


ती खुर्ची साऱ्यांनीच नाकारली
म्हणून जिज्ञासेनं निरखली

 तिच्या चारी पायांना सायांचेच हात होते
 सान्यांच्या नजरेत त्याचेच तर भय होते !

ती खुर्ची साऱ्यांनीच नाकरली
म्हणून मी स्वीकारली
आणि ... ...

 तिला अचानक मागणी आली
 'मागणी'च घायकुतीला आली तेव्हा

मी म्हणाले,

 “घेईना का भली
 आपल्या शिवाय आहे कुणी तरी वाली"

खुर्ची दिली नि मनगटातून कळ आली
पाह्यलं - मनगटावरच खुर्चीचं पाय टेकलं

 माझंच दान माझ्यावर शेकलं

तेव्हा उमजलं-

 कोणाचे काही का असेना

 खुर्ची म्हणजे राक्षसगणी मेना !

उष:काल । ४१