पान:उषःकाल.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृक्षदंड


मी स्वागतास तुमच्या
असा वृक्षदंड आहे

  किती वसंत आले- गेंले
  नाते जीवांशी जडले
  अशा घडण्यात माझ्या
  मी दयावंत आहे .. .. ...


फुले फुलली अनेक
कळया खुडल्या कित्येक
अशा लुटीतही माझ्या


  माझा मानदंड आहे .. .. ..


पाय मातीत रूतले
हात आकाशी गुंतले
मी अरण्यात माझ्या


  असा भाग्यवंत आहे

उषःकाल । ४०