पान:उषःकाल.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांज

अशीच होती सांज सावळी
नजरही होती उगी बावळी

  त्या नजरेच्या घरटया मधुनी
  गंधुनी उमले कल्पना खुळी

हिरव्या हिरव्या गालीच्यावर
फुले बहरली निळी जांभळी

  गौर गुलाबी गालावरती
  पडे निरागस गोड खळी

रान केवड्या राना मधुनी

नजरही झाली खुळी

उषःकाल । ३९