पान:उषःकाल.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

   संशय


   गोष्टीतील राजा-राणी
   भाबडी अन् चिऊ-काऊ

   ऐकुनिया झाले मन
   असे लोण्याहून मऊ

   दर येणारी घटिका
   मज वाटताहे बाऊ

   काही वेळा अशा आल्या
   फुटे आसवांचे प्याऊ

   साऱ्या जखमाच ओल्या
   कशा उघडुनी दाऊ ?

   तशा दाविल्या एकदा
   कशी विसरून जाऊ ?

   न लावाल मशाल
   कसा भरवसा ठेऊ ?

   मित्र द्रोहाचीच पुन्हा
   कशी परीक्षा मी घेऊ ?

   नाही मनुष्य पारख

   का आत्मदोष देऊ ?

उष:काल । ३८