पान:उषःकाल.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतो, "देवा, ! कृपा आपली
असली बाईल नसती खपली


मीच करंटा माझ्या भाळी
येऊन नटली राधा साळी


उगीच जेव्हा तेव्हा जपली
असून बावळी, म्हटली आपली "


थांबून थोडे म्हणतो साळी,
“एकच गोळी सांज सकाळी"


राधा सांगे कानी कपाळी
"नशीब माझे लई दुष्काळी"


"सोडा गोळी, आपण साळी
काय सौख्यपण आपुल्या भाळी ?"


ऐकून साळी देतो गाळी
नेते राधा हात कपाळी

रोज चालते अशी- भूपाळी

उष:काल । ३६