पान:उषःकाल.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्येच म्हणतो "बाईल भोळी"
तुम्ही पाहिली, आहे दुबळी ?

परी गोजिरी नाकी डोळी
नाव सांगते राधा साळी

आली जेव्हा उचले टोळी
बाईल माझी आफत टाळी

देऊन त्यांना आपुली शेळी
लपण्यास मला देई कांबळी

असे सावळी दिसे बावळी
पुरी वेंधळी-प्रेम आंधळी

नशेत चढता अण्णा साळी
रोज खेळतो असली खेळी

उठून लगबग रोज सकाळी
नशेत गातो नवी भूपाळी

"बाईल माझी साधी भोळी
रोज लावते टिळा कपाळी"

ऐकून नेते हात कपाळी
जपून कुंकू खुळी कळवळी

पाहून सारे अण्णा साळी

मनापासूनी अश्रू ढाळी

उष:काल