पान:उषःकाल.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अण्णा साळी


अण्णासाळी रोज सकाळी
घेत होता गोळी गोळी

घरात चाले शिमगा होळी
याची आपुली रोज दिवाळी

आली एकदा उचले टोळी
घेऊन गेली त्याची शेळी

बाईल त्याची खुळी - बावळी
आणते कष्टून बांधून मोळी

विकून मोळी भूक जाळी
रोज कष्ट हे तिच्या कपाळी

फडक्याची अन् करून झोळी
अण्णा साळी मागे पोळी

फिरत असतो आळीन् आळी
कोण देईल वेळोवेळी ?

घेत असतो मधल्या वेळी
अफू-गांजाची गोळी गोळी

उतरे नशा उतरे गोळी

शोधू लागतो आपुली शेळी

उष:काल । ३४