पान:उषःकाल.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कहाणी


आवाज 'आई' म्हणोनी
पडतो सुरेल कानी
सांगे सखी मनाशी
आपुली आयुष्य कहाणी

होते फुलुनी गेले
घरटे तिन्ही फुलांनी
गंधात नहात होते
साया भल्या सुखांनी

येता सारे स्मरूनी
नयनात अश्रू भरूनी
सांगे सखी मनाशी
आपुली आयुष्य कहाणी

'आई' म्हणून श्रवणी
पडती तुषार कानी
घायाळ बनुनी हरिणी

गाते मनी विराणी

उषःकाल