पान:उषःकाल.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गांधारी


सत्यधर्म तो
  गांधारी सम-
  पोटच्या असत्यास शापून
  पाठच्या असत्यावर कोपून
  निरपेक्ष जळणारा

सत्यधर्म तो
  गांधारीचा -
  स्वतंत्र निर्भर, चैतन्यरुप
  पाठमोन्या सत्यास पुकारणारा
  पाठ त्याची नाकारणारा
  सत्यासाठी - सत्यालाच ललकारणारा

सत्यधर्म असे
  गांधारीचा-
  भगवंताच्या शब्दास
  निःशब्द करणारा
  प्रारब्धास

  विश्रब्ध करणारा !

उष:काल । ३२