पान:उषःकाल.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संचित


गर्दीत मी असोनी, तशी एकटीच आहे
हे हास्य-शब्द फसवे, जाणून स्वस्थ आहे

 आपुलाच स्वार्थ-सौख्य पामर कुणीही पाहे
 हा धर्म कलियुगाचा लावून अर्थ पाहे

निष्ठा, खुणा मनाच्या जणु लोपल्याच पाहे
तरी मी तयात माझे हृदयस्त शोधिताहे

 कोणी वृथाच येथे अडवून स्थान आहे
 वाड्यात चिरेबंदी श्वानास मान आहे

ती लाच-भूक नाही, मी दूर वंचिताहे
हे भाग्य या जीवाचे की पूर्व संचिताहे ?

 खाणीत कोळशाच्या मी रत्न धुंडिताहे

 द्याया हिशेब त्याचा आयुष्य मांडिताहे

उष:काल । २१