पान:उषःकाल.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नॉटपेड


पत्र 'नॉटपेड' आले
जीव कासावीस झाले
झाले शिमग्याचे गीत
असे त्यांनी काव्य केले
   "आले मरण जीवाला
   काय वेगळाले झाले ?
   पत्र आम्हास धाडून
   काय मोठेपण दिले ?"
धाडा उत्तर तयांना
"पत्र तुमचे मिळालें
सोडवून घेता ठेवा
खार पदराला जाळे"
   अशा भेकडांचे ओठी
   हास्य कुचेष्टेचे आले
   मरे कोणाचे हो कोण
   यांना पाहिजे पाहिले
तत्वज्ञानच फुकाचे
यांची बोलाचीच बात
कढी बोलाचीच केली
बोलाचाच केला भात
   भोवतालच्या साऱ्यांनी
   एकमेका दिली साथ
   व्यथा आपुल्या सांगून

   मरणाची केली बात !

उप. काल । २०