पान:उषःकाल.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परतत्व


आज मोगरा फुलला
कसा मोगरा फुलला ?
नाही पाणीही वेळेला
तरी शुभ्र फुलारला

नाही माळी जिव्हाळ्याचा
नाही वारा फिरकला
परी मोग-याचा वेलु
जीवे वरी सरकला

नाही भ्रमरांची दाटी
गाया स्तुतीच्या गुलाला
परी मोगऱ्याची माला
लागे उधळू गंधाला

लागे कवित्व स्फुराया
बरवे रसिक तत्वाला
स्पर्श रसिकाला होता
आले परतत्व फळाला

असा अंतरीचा हेतु
असा जिव्हार मिळाला
भावभक्तीचिया लोभा

लाभे ईश्वर जीवाला

उषःकाल । १९