पान:उषःकाल.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दीप


दीप माझा तेजाळला
पुन्हा विझुनिया गेला !

दीप विझुनिया गेला !
कसा विझुनिया गेला ?

कुणी विखारी फुंकर
अशी घातली तयाला ?

कसा अवचित असा
दुष्ट झंझावात आला ?

नाही घातली फुंकर
नाही वात झंझावला

स्नेह आतला आटला

दीप विझुनिया गेला !

उषःकाल । १८