पान:उषःकाल.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उषःकाल


एका रातीच्या मनात
सत्य डवरुन आले
आसू-काळोखाचे ओझे तिच्या शेल्यात साठले

तिच्या रिकाम्या ओटीत
दाट काळोख घाटले
उभ्या रातीचे अंधारी ऊर फाटले फाटले

बहरली काळ रात्र
मन सुन्न चक्रावले
चांद पुनवेचा स्वर्गी तिज भ्रमला वाटले

तिच्या दुःखाचे उमाळे
आणि अश्रू मावळले
नाही चंद्र पुनवेचा, झुंजूमुंजू प्रभाळले

हर रातीच्या ललाटी
नसे रुपेरी चांदुले
परी ओटीत वाढते उषःकालाचे तान्हुले

जाण प्रकाशाची येता
तिने नेत्र विस्फारिले

रवी किरणांचे स्पर्श तिने मोक्ष अव्हेरिले !

उष:काल । १७