पान:उषःकाल.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जात मानवाची


मानती उपकार सारे पूर्णतेच्या श्रेयसाचे
मेले शिपाई, सरदार तुम्ही त्या यशाच्या वारसाचे


भव्य प्रासादास तुमच्या रक्त अश्रुंचा गिलावा
सडक सम्राटास तेथे काय थंडावा मिळावा ?


मतलबी उपकार तुमचे चालती काठावरी
भोवऱ्याला नाव जाता आन्हिके घाटावरी


पोसतो विद्यगर्भ तुमचा पाहता दुज्याची लेकरे
पोटची का वाटताती सद्गुणी ती पाखरे ?


कोण तुम्ही सांगणारे जातीचे मार्तंड हो ?
संस्कृतीला मानता का मतलबी उतरंड हो ?


सोयीचे ते सत्य, त्याचा कोरडा डंका फुका
लाळघोटचा तुमच्या जीण्याची जात धिक्काराल का ?


जात मोठी लावुनिया करणी खोटी चालते
वूट चाटुनी कुणाचे ? चरणी पडता पालथे !


जातीचा मिरवुनी दिमाख जात का डागाळता ?

मानवाची जात असता व्यर्थ प्राणी वाटता !

उषःकाल । १६