पान:उषःकाल.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभेद


न म्हणता लाच
पण सांगितलेली 'खुशी'
दोन्ही एकच असतात लाचारीचा पदर धरुन

न कळलेला दोस्त
अन् ओळखलेला शत्रू
दोन्ही सारखेच असतात पाठी-पोटावर भाले रोखून

ठोकरलेलं आध्यात्म
नि पांघरलेलं आध्यात्म
दोन्ही अभेदच असतात असत्याशी पाट लावून

संतापलेलं भग्नमन
अन् खुशीतल प्रसन्नमन
दोन्ही वाटचाल करतात दगाबाजाशी फारकत घेऊन

मोडलेलं वचन
अन् तोडलेली शपथ

दोन्ही भ्रष्टच असतात सोय- स्वार्थाशी व्यभिचार करून

उषःकाल १५