पान:उषःकाल.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्याय


त्याला आता कोडंच पडलं कसं ?
की, ती त्याची 'जीवलग'च असं !

त्याचा एकेकाळचा कलिजा
उडविला आज त्याचाच फज्जा

त्याच्या जवळचं आयुधाचं ओझं
तिनं मागितलं लाजं-काजं

आणि पुन्हा 'शस्त्र तुझीच' म्हणून
जखमीलाच गेली हिणवून

असं कसं विपरीत झालं ?
तिनं त्यालाच पारध केलं ?

जन्माचा साथी, जीवाचा सोबती

पण त्यालाच गारद केलं !

उष:काल । १४